Nobel Prize Literature: लेखक जॉन फॉस्से यांना साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर

आतापर्यंत वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.
Nobel Prize Literature: लेखक जॉन फॉस्से यांना साहित्य क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर

साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून नॉर्वजियन लेखक जॉन फॉस्से यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या नाविन्यपूर्ण नाटकांच्या लेखनासाठी त्यांना या सन्मानाने गौरविन्यात आलं आहे. त्यांनी उपहासात्मक लिखाण एका वेगळ्या शैलीत लिहिलं. त्यांची हीच शैली पुढे 'फॉस मिनिमलिझम' या नावाने ओळखली जाऊ लागली. त्यांच्या १९८५ साली प्रकाशित झालेल्या 'स्टेंज्ड गिटार' या दुसऱ्या कादंबरीत त्यांच्या या शैलीची प्रकर्षाने जाणीव होते.

गेल्या वर्षी(२०२२) साहित्याचा नोबेल पुरस्कार फ्रेंच लेखिका अॅनी एरनॉक्स यांना देण्यात आला होता. त्यांचा जन्म १ सप्टेंबर १९४० रोजी झाला. फ्रेंच लेखिका तसंच फ्रेंच साहित्याच्या प्राध्यापिका म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. त्यांनी विशेषकरुन आत्मचरित्र समाजशास्त्रावर लिखाण केलं आहे.

जॉन फोस्से यांनी भरपूर साहित्य लिहिलं आहे. नॉर्वेजियन निनॉर्स्कमध्ये लिहिलेल्या आणि विविध शैलीत पसरलेल्या त्याच्या अफाट ओव्यामध्ये नाटके, कादंबरी, कविता संग्रह, निवंध, मुलांची पुस्तके आणि अनुवाद यांचा समावेश आहे. त्यांचा जन्म १९५९ मध्ये नॉर्वेमध्ये झाला. त्यांनी नॉर्वेजियन निनॉर्स्कमध्ये त्यांचं बहुतांश लिखान केलं आहे. त्यात अनेक कथा, नाटके, कादंबरी, कविता संग्रह निबंध यांचा समावेश आहे. आतापर्यंत वैद्यकशास्त्र, रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

विविध क्षेत्रात मानवतेसाठी मोलाचं कार्य करणाऱ्यांच्या सन्मान म्हणून या पुरस्काराचं वितरण केलं जातं. स्वीडिश उद्योगपती आणि डायनामाईटचे शोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो.

logo
marathi.freepressjournal.in