मेंदूच्या कार्यावर संशोधन : तीन शास्त्रज्ञांना नोबेल; जर्मनी-अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील बहुमान

यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून, मेंदूतील वैयक्तिक चेतापेशींचे कार्य सुरू किंवा बंद करण्याच्या यंत्रणेवर संशोधन करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना हा बहुमान मिळाला आहे.
मेंदूच्या कार्यावर संशोधन : तीन शास्त्रज्ञांना नोबेल; जर्मनी-अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील बहुमान
मेंदूच्या कार्यावर संशोधन : तीन शास्त्रज्ञांना नोबेल; जर्मनी-अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील बहुमान X|NobelPrize
Published on: 

स्टॉकहोम : यंदाचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला असून, मेंदूतील वैयक्तिक चेतापेशींचे कार्य सुरू किंवा बंद करण्याच्या यंत्रणेवर संशोधन करणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना हा बहुमान मिळाला आहे. कार्ल डायसेरोथ (वय ५४), पिटर हेगेमन (वय ७१) आणि जॉर्ज नागेल (वय ७३) अशी या तीन शास्त्रज्ञांची नावे असून, त्यांनी प्रकाश-नियंत्रित आयन चॅनेल आणि 'ऑप्टोजेनेटिक्स' या विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. हे तिन्ही शास्त्रज्ञ जर्मनी आणि अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये कार्यरत आहेत.

नोबेल समितीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर पोस्ट करत त्यांच्या संशोधनाचे कौतुक केले आहे. मेंदूची रहस्ये उलगडण्यासाठी हे तंत्रज्ञान आज जगभरातील प्रयोगशाळांमध्ये वापरले जात आहे, असे समितीने नमूद केले. नोबेल असेंब्लीने दिलेल्या माहितीनुसार, कार्ल डायसेरोथ हे कॅलिफोर्नियाच्या स्टॅनफर्ड विद्यापीठात, तर पिटर हेगेमन हे बर्लिनमधील हंबोल्ट विद्यापीठात आणि जॉर्ज नागेल हे जर्मनीच्या वुर्झबर्ग विद्यापीठात कार्यरत आहेत. वैद्यकशास्त्र समितीचे सचिव थॉमस पर्लमॅन यांनी सोमवारी या तिन्ही विजेत्यांशी फोनवरून संपर्क साधून त्यांना या पुरस्काराची माहिती दिल्याचे सांगितले.

पुढील घोषणांचे वेळापत्रक

सोमवारी वैद्यकशास्त्र पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर, मंगळवारी भौतिकशास्त्र, बुधवारी रसायनशास्त्र आणि गुरुवारी साहित्याचा नोबेल पुरस्कार जाहीर केला जाईल. शुक्रवारी शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाल्यानंतर, १२ ऑक्टोबर रोजी अर्थशास्त्रातील नोबेल स्मृती पुरस्काराची घोषणा केली जाईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in