उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांच्या युद्धखोर वृत्तीमुळे ही चिंता वाढू लागली आहे. उत्तर कोरिया शस्त्रास्त्रांच्या शर्यतीत असून विविध शस्त्रांच्या वेगाने चाचण्या करत आहे.
उत्तर कोरियाकडून गोळीबार करण्यात आल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे. काही दिवसांपूर्वी नवीन क्षेपणास्त्र चाचणी अयशस्वी झाल्यानंतर उत्तर कोरियाने रविवारी अनेक लहान-श्रेणीतील रॉकेट लाँचर्स डागले.
उ. कोरिया लवकरच आपलं सर्वात लांब पल्ल्याचं बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रक्षेपित करेल, असा अंदाज लावला जात आहे. हा देश अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रं मिळवून स्वतःचा शस्त्रसाठा मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. यासाठी तो दबाव आणण्याचा आणि अमेरिकेकडून सवलती मिळविण्याचा प्रयत्न करू शकतो.