अमेरिकी विमाने पाडण्याची उत्तर कोरियाची धमकी

उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांच्या चाचण्याही घेतल्या
अमेरिकी विमाने पाडण्याची उत्तर कोरियाची धमकी

सेऊल : अमेरिकेची हेरगिरी करणारी विमाने आणि ड्रोन पाडण्याची धमकी उत्तर कोरियाने दिली आहे.

गेले सलग आठ दिवस अमेरिकेची हेरगिरी करणारी विमाने आणि ड्रोन उत्तर कोरियाच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरून घिरट्या घालत आहेत. अनेक वेळा त्यांनी देशाच्या हवाई हद्दीचा भंग केला आहे. अमेरिकेने कोरियाजवळच्या समुद्रात अणुपाणबुड्या आणून विनाकारण दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे. हे प्रकार तातडीने थांबले नाहीत, तर अमेरिकी विमाने आणि ड्रोन पाडण्यात येतील, असा इशारा उत्तर कोरियाच्या प्रवक्त्याने दिला आहे. हा इशारा दिल्यानंतर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांच्या चाचण्याही घेतल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in