एनव्हिडियाच्या सीईओपदी जेन्सेन हुआंग यांची फेरनियुक्ती

चिनी गुप्तहेराशी कथित संबंध असल्याच्या आरोपांसह विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणामुळे पद सोडलेल्या जेन्सेन हुआंग यांची एनव्हिडियाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) सोमवारी पुनर्नियुक्ती करण्यात आली.
एनव्हिडियाच्या सीईओपदी जेन्सेन हुआंग यांची फेरनियुक्ती
एनव्हिडियाच्या सीईओपदी जेन्सेन हुआंग यांची फेरनियुक्ती
Published on: 

न्यूयॉर्क : चिनी गुप्तहेराशी कथित संबंध असल्याच्या आरोपांसह विवाहबाह्य संबंधांच्या प्रकरणामुळे पद सोडलेल्या जेन्सेन हुआंग यांची एनव्हिडियाच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) सोमवारी पुनर्नियुक्ती करण्यात आली. कंपनीच्या संचालक मंडळाने एकमताने हा निर्णय घेतला. हुआंग यांचा प्रामाणिकपणा आणि कंपनीचे नेतृत्व करण्याची पात्रता याबाबत मंडळाने समाधान व्यक्त केले आणि त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे राष्ट्रीय सुरक्षेला कोणताही धोका नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

एनव्हिडियाने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, हुआंग यांची पुनर्नियुक्ती भागधारक, कर्मचारी, भागीदार आणि ग्राहकांच्या हिताची आहे. अमेरिकन सरकारच्या वरिष्ठ स्तरावरही या निर्णयाबाबत चर्चा आणि सल्लामसलत करण्यात आली. हुआंग यांनी पुनर्नियुक्तीबद्दल आनंद व्यक्त करत मंडळाच्या विश्वासाबद्दल आभार मानले. नव्या औद्योगिक क्रांतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात जगातील महत्त्वाच्या तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एका कंपनीचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)