बांगलादेशात शपथविधीला ओम बिर्ला जाणार

बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारीक रेहमान यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे जाणार आहेत.
बांगलादेशात शपथविधीला ओम बिर्ला जाणार
(संग्रहित छायाचित्र)
Published on

नवी दिल्ली : बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारीक रेहमान यांच्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे जाणार आहेत. तारीक रेहमान यांचा १७ फेब्रुवारी रोजी ढाका येथे शपथविधी आयोजित केला आहे. या शपथविधीसाठी नरेंद्र मोदी यांना निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, भारत सरकारच्या वतीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे उपस्थित राहतील, असे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने सांगितले. तारीक रहमान यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने बांगलादेशातील संसदीय निवडणुकांत दणदणीत विजय मिळवला आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे की, ‘या महत्त्वाच्या कार्यक्रमातील अध्यक्षांची उपस्थिती भारत आणि ‘बांगलादेश’च्या जनतेमधील दृढ व टिकाऊ मैत्री अधोरेखित करते आणि दोन्ही राष्ट्रांना बांधून ठेवणाऱ्या लोकशाही मूल्यांप्रति भारताची ठाम बांधिलकी पुन्हा एकदा स्पष्ट करते.

सामायिक इतिहास, संस्कृती आणि परस्पर सन्मानाने जोडलेले शेजारी राष्ट्र म्हणून, तारीक रहमान यांच्या नेतृत्वाखाली लोकांनी प्रचंड बहुमताने मान्यता दिलेल्या, निवडून आलेल्या सरकारकडे बांगलादेशच्या संक्रमणाचे भारत स्वागत करतो,’ असेही निवेदनात नमूद केले.

logo
marathi.freepressjournal.in