इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस अनेक चार्जर मात्र एक?

युरोपातील ग्राहक अनावश्यक चार्जर खरेदीवर २५० दशलक्ष युरो (२६७ दशलक्ष डॉलर्स) बचत करू शकतील
 इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस अनेक चार्जर मात्र एक?
Published on

आपण मोबाईल, लॅपटॉप, टॅबलेट, इअरफोन आदी प्रत्येक उपकरणांसाठी वेगवेगळा चार्जर वापरतो. समजा हा चार्जर हरवला तर दुसरा चार्जर घ्यावा लागतो. त्यामुळे घराघरात अनेक चार्जर घ्यावे लागतात. त्यामुळे पैसे जातातच तर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंतून प्रदूषण होते. युरोपियन महासंघाने याबाबत एक मोठा जारी केला आहे. इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस कोणतेही असो, चार्जर एकच असेल. त्यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे. तसेच ग्राहकांचे पैसे वाचणार आहेत.

युरोपियन महासंघाच्या संसदेने सांगितले की, २०२४ पर्यंत यूएसबी टाईप-सी हा चार्जिंग पोर्ट युरोपातील सर्व मोबाइल, टॅब्लेट, कॅमेरा, की बोर्ड, हेड फोन, डिजिटल कॅमेरा, ईअर बड्स‌, संगणकाचा माऊस, पोर्टेबल नेव्हिगेशन आदींसाठी बनवावा लागेल.

युरोपियन संसदेचे प्रवक्ते एलेक्स एगियस सलीबा म्हणाले की, वायर चार्जिंग सोबत वायरलेस चार्जिंगचाही त्यात समावेश केला आहे. या निर्णयामुळे युरोपातील ग्राहक अनावश्यक चार्जर खरेदीवर २५० दशलक्ष युरो (२६७ दशलक्ष डॉलर्स) बचत करू शकतील. सर्व डिव्हाईसला एकच चार्जर असल्यास ११ हजार टन इलेक्ट्रानिक्स कचरा कमी होईल.

logo
marathi.freepressjournal.in