पहलगाम दहशतवादी हल्ला : संयुक्त राष्ट्रांनींही पाकिस्तानला फटकारले

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले असल्याने आता त्यांनी संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेत मदतीची याचना केली.
पहलगाम दहशतवादी हल्ला : संयुक्त राष्ट्रांनींही पाकिस्तानला फटकारले
Published on

संयुक्त राष्ट्रे/नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने उचललेल्या पावलांमुळे पाकिस्तानचे धाबे दणाणले असल्याने आता त्यांनी संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेत मदतीची याचना केली. मात्र तेथेही पाकिस्तान चांगलेच तोंडघशी पडले, संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताला बहुतेक देशांनी पाठिंबा दर्शविला आणि पाकिस्तानला चांगलेच फटकारले.

दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचला. दोन्ही देशांकडून युद्धाची तयारी सुरू करण्यात आली. त्यामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने सोमवारी बंद दाराआड चर्चा आयोजित केली. पाकिस्तानने या तणावावर तातडीची बैठक बोलावण्याची मागणी केली होती, तर भारताने सीमेपलीकडील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. यूएनमध्ये भारताला १५ पैकी १३ सदस्य देशांनी पाठिंबा दिला.

आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या विरोधी वातावरण तयार होत असल्याचे पाहून पाकिस्तानने थेट संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडे धाव घेतली. या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी सुरक्षा परिषदेची तातडीची बैठक बोलावण्याची विनंतीही केली. पाकिस्तानच्या विनंतीवर बैठक आयोजित करण्यात आली, पण यात पाकिस्तानलाच अनेकांनी सुनावले.

न्यूयॉर्कमधील सूत्रांच्या हवाल्याने एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीत सर्व सदस्यांनी पाकिस्तानला पहलगाम हल्ला व त्यानंतरची आततायीपणाची पावले यावरून खडे बोल सुनावले. मंगळवारी सकाळी झालेल्या या बैठकीत पाकिस्तानला पहलगाम हल्ल्यासंदर्भात कठोर प्रश्न विचारण्यात आले. पाकिस्तानकडून भारताला दोष देण्याचे अपयशी प्रयत्न बैठकीत इतर सदस्यांवर पुरेसा प्रभाव पाडू शकले नाहीत.

लष्कर-ए-तोयबाचे कनेक्शन?

दरम्यान, पहलगाम हल्ल्याचा पाकिस्तानातील दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाशी आहे का, असाही सवाल बैठकीत पाकिस्तानला विचारण्यात आला. याशिवाय, पहलगाम हल्ल्याचा निषेध करतानाच या हल्ल्यासाठी दोषी व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करण्याची मागणी इतर राष्ट्रांनी केली. काही सदस्यांनी पाकिस्तानने नुकत्याच केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीवर आक्षेप घेतला.

पूंछमध्ये पाकिस्तानच्या नागरिकाला अटक

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमधील नियंत्रणरेषेवर (एलओसी) एका पाकिस्तानी नागरिकाला मंगळवारी अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी रेंजरला अटक करण्यात आली होती. तसेच ३ आणि ४ मे रोजी मध्यरात्री पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी नागरिकाला भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना अटक केली होती. मोहम्मद हुसेन असे त्याचे नाव आहे. त्यानंतर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

लढाईसाठी अमेरिका संसाधने पुरविणार

पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने भारताला समर्थन दिले आहे. अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह इतर नेत्यांनीही भारताला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या लढाईसाठी अमेरिकेने आवश्यक ती संसाधने भारताला पुरवली जातील, असे म्हटले आहे. भारताला दहशतवादाविरुद्ध उभे राहावे लागेल, आम्ही त्या प्रयत्नांना पाठिंबा देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करू, ट्रम्प प्रशासन दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारताला ऊर्जा आणि संसाधनांसह मदत करेल, असे अमेरिकेचे जॉन्सन यांनी सांगितले.

रशियाकडून भारताला ब्राह्मोससज्ज युद्धनौका

पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारत २८ मे २०२५ रोजी रशियाकडून 'तमाल' ही गुप्त युद्धनौका खरेदी करणार आहे. यंतर शिपयार्डमध्ये बांधलेल्या या तलवार-श्रेणीच्या फ्रिगेटमध्ये ब्राह्मोस क्षेपणास्त्रे आहेत. दोन्ही देशातील लष्कर अलर्ट आहेत. दरम्यान, आता रशियाने भारताला मोठा पाठिंबा दिला आहे. सोमवारी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांनी फोन करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत संवाद साधून पाठिंबा दिला होता. ही युद्धनौका घातक ब्रह्मोस जहाजविरोधी क्षेपणास्त्र सोडण्यास सक्षम आहे.

पूंछमध्ये पाकिस्तानच्या नागरिकाला अटक

जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमधील नियंत्रणरेषेवर (एलओसी) एका पाकिस्तानी नागरिकाला मंगळवारी अटक करण्यात आली. गेल्या काही दिवसांतील ही तिसरी घटना आहे. काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी रेंजरला अटक करण्यात आली होती. तसेच ३ आणि ४ मे रोजी मध्यरात्री पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये सीमा सुरक्षा दलाने एका पाकिस्तानी नागरिकाला भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना अटक केली होती. मोहम्मद हुसेन असे त्याचे नाव आहे. त्यानंतर त्याला पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

logo
marathi.freepressjournal.in