पाकचे लष्करप्रमुख मुनीर पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार; दोन महिन्यांत दुसरा दौरा

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिफ मुनीर हे पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत मुनीर यांचा हा दुसरा अमेरिकन दौरा आहे.
पाकचे लष्करप्रमुख मुनीर पुन्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार; दोन महिन्यांत दुसरा दौरा
Published on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिफ मुनीर हे पुढील आठवड्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. गेल्या दोन महिन्यांत मुनीर यांचा हा दुसरा अमेरिकन दौरा आहे. जनरल मुनीर हे अमेरिकेच्या मध्यवर्ती कमांडचे कमांडर जनरल मायकेल कुरिल्ला यांच्या निरोप समारंभात सहभागी होण्यासाठी अमेरिकन दौऱ्यावर जात आहेत.

मुनीर यांचा हा दौरा पाकिस्तान व अमेरिकेतील संबंध दृढ झाल्याचे संकेत देत आहे. ‘टॅरिफ’मुळे भारत व अमेरिकेदरम्यान संबंध ताणले गेलेले असतानाच हा दौरा होणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानवर अमेरिकेने केवळ १९ टक्के ‘टॅरिफ’ लावले आहे.

logo
marathi.freepressjournal.in