पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला, १० जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात केलेल्या हल्ल्यात नऊ मुलांसह दहा जण मारले गेले असल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारने मंगळवारी दिली.
पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला, १० जणांचा मृत्यू
पाकिस्तानचा पुन्हा अफगाणिस्तानवर हल्ला, १० जणांचा मृत्यूप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

काबूल : पाकिस्तानच्या सैन्याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या खोस्त प्रांतात केलेल्या हल्ल्यात नऊ मुलांसह दहा जण मारले गेले असल्याची माहिती अफगाणिस्तान सरकारने मंगळवारी दिली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा हल्ला मध्यरात्री झाला असून त्यात स्थानिक लोकांवर निशाणा साधला आहे. त्यामुळे सीमेवर तणाव पसरला आहे. तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद यांनी सांगितले की, मंगळवारी सकाळी १२च्या सुमारास गुरबुज जिल्ह्याच्या मुगलगई परिसरात हा हल्ला करण्यात आला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी लिहिले की, पाकिस्तानी दहशतवाद्यांनी स्थानिक नागरिक काजी मीर यांचा मुलगा वालियत खान यांच्या घरावर बॉम्ब फेकले त्यात ९ मुलांचा मृत्यू झाला. यामध्ये पाच मुले आणि चार मुलींचा समावेश आहे. त्यात एका महिलेचाही मृत्यू झाला आहे. मुजाहिद यांनी सांगितले की, सोमवारी रात्री कुनार आणि पक्तिका प्रांतात वेगवेगळे हवाई हल्ले झाले, ज्यामध्ये चार सामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकला आहे.

ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांमध्ये काही काळ शांतता होती, मात्र आता पुन्हा तणाव वाढला आहे. याआधी ९ ऑक्टोबर रोजी पाकिस्तानने काबुल, खोस्त, जलालाबाद आणि पक्तिकामध्ये एअरस्टाईक केला होता. त्यानंतर अफगाण तालिबाननेही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

logo
marathi.freepressjournal.in