पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानात ४६ ठार

पाकिस्तानने शेजारच्या अफागाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह ४६ जण ठार झाल्याचे तालिबानने म्हटले आहे.
पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यात अफगाणिस्तानात ४६ ठार
Published on

पेशावर : पाकिस्तानने शेजारच्या अफागाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह ४६ जण ठार झाल्याचे तालिबानने म्हटले आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांना स्थानिक रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.

अफगाणिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या पाकतिका प्रांतातील घुसखोरांना ठार करण्यासाठी आणि तेथील प्रशिक्षण केंद्रे उद्धवस्त करण्यासाठी हवाई हल्ले करण्यात आल्याचे पाकिस्तानच्या सुरक्षा अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानी तालिबानचा प्रवक्ता मोहम्मद खुरासनी याने सांगितले की, या हल्ल्यात किमान ५० जण ठार झाले असून त्यामध्ये २७ महिलांचा समावेश आहे. तथापि, पाकिस्तानने या हल्ल्याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या हल्ल्यांमुळे दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने या हल्ल्याचा निषेध केला आहे.

logo
marathi.freepressjournal.in