सानिया मिर्झाला 'तलाक' न देता शोएब मलिकने सना जावेदशी केले तिसरे लग्न! सोशल मीडियावर शेअर केले फोटो

सानियापूर्वी शोएबचे लग्न आयेशा सिद्दीकी हिच्याशी झाले होते. पण, शोएबने नेहमी याला नकार दिला. आयेशाचे संपूर्ण प्रकरण फसवणुकीच्या घटनेशिवाय दुसरे काही नव्हते, असे शोएबने त्यावेळी सांगितले होते.
सानिया मिर्झाला 'तलाक' न देता शोएब मलिकने सना जावेदशी केले तिसरे लग्न! सोशल मीडियावर शेअर केले फोटो

पाकिस्तानचा स्टार क्रिकेटपटू शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून माजी भारतीय टेनिसपटू सानिया मिर्झा आणि शोएब मलिक विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. शोएबने आज (शनिवारी) त्याच्या आणि सना जावेदच्या लग्नाचे फोटो स्वतःच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करीत सानिया मिर्झासोबतचा संसार मोडल्याच्या बातम्यांनाही दूजोरा दिला. तथापि, शोएबने सानियाला तलाक दिला आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही.

पाकिस्तानी माध्यमांनुसार, दोघेही(सानिया-शोएब) वेगळे राहत आहेत, पण घटस्फोट घेतलेला नाही. शोएबने यापूर्वीही असेच केले आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देता त्याने सानियाशी लग्न केले होते. आता त्याने तिसऱ्या लग्नातही असेच केले आहे. सानिया ही शोएबची पहिली नसून दुसरी पत्नी आहे. सानियापूर्वी शोएबचे लग्न आयेशा सिद्दीकी हिच्याशी झाले होते. पण, शोएबने नेहमी याला नकार दिला. सानियासोबतच्या लग्नादरम्यान, आयशा आणि तिच्या कुटुंबियांनी शोएबवर राष्ट्रीय दूरचित्रवाणीवरून तलाक न घेता दुसरे लग्न करत असल्याचा आरोप केला होता. तर, आयेशाचे संपूर्ण प्रकरण फसवणुकीच्या घटनेशिवाय दुसरे काही नव्हते, असे शोएबने त्यावेळी सांगितले होते.

दरम्यान, सानिया आणि शोएबचे 2010 मध्ये लग्न झाले आणि दोघे 12 वर्षे एकत्र राहत होते. दोघांना २०१८ मध्ये इझान हा मुलगाही झाला. गेल्या वर्षी दोघांनीही त्यांच्या मुलाचा वाढदिवस दुबईत साजरा केला होता. मात्र, वर्षाच्या शेवटी दोघांनी त्यांचे सोशल मीडियावरील बायो बदलले. त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याच्या बातम्या सतत येत होत्या. तसेच, दोन दिवसांपूर्वी सानियाने तिच्या इंन्स्टाग्रामवर "Marriage is hard. Divorce is hard. Choose your hard", अशा आशयाची स्टोरी टाकली होती. यानंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला होता.

logo
marathi.freepressjournal.in