पाकिस्तानात मशिदीत आत्मघाती स्फोट; २१ ठार, Video

पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात शुक्रवारी नमाज सुरू असताना मशिदीत झालेल्या आत्मघाती स्फोटात १६ पोलिस कर्मचाऱ्यांसह २१ जणांचा मृत्यू झाला.
पाकिस्तानात मशिदीत आत्मघाती स्फोट; २१ ठार, Video
पाकिस्तानात मशिदीत आत्मघाती स्फोट; २१ ठार, Video(Photo-X)
Published on

पेशावर : पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील कोहाट जिल्ह्यात शुक्रवारी नमाज सुरू असताना मशिदीत झालेल्या आत्मघाती स्फोटात १६ पोलिस कर्मचाऱ्यांसह २१ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटात ७८ जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली.

स्फोटकांनी भरलेले वाहन पोलिस लाइनच्या प्रवेशद्वारावर धडकवण्यात आले. त्यानंतर स्फोट झाला आणि दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

दहशतवाद्यांशी सुरक्षा दलांची चकमक सुरू असतानाच स्पेशल ब्रँचच्या इमारतीत आणखी एक आत्मघाती स्फोट झाला.

पेशावरमधील केंद्रीय पोलीस कार्यालयाच्या माहितीनुसार, सात सशस्त्र दहशतवादी पोलिस लाइनमध्ये घुसले होते. त्यानंतर पोलिस आणि दहशतवादविरोधी पथकाने त्यांच्याशी चकमक केली. आतापर्यंत सहा दहशतवादी ठार झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यात आत्मघाती हल्लेखोर आणि स्नायपरचा समावेश आहे.

या हल्ल्याची जबाबदारी इत्तेहाद-उल-मुजाहिदीन पाकिस्तान या तुलनेने अपरिचित दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. हाफिज गुल बहादूर ग्रुप, हरकत इन्किलाब-ए-इस्लामी पाकिस्तान आणि लष्कर-ए-इस्लाम या संघटनांच्या आघाडीतून एप्रिल २०२५ मध्ये या संघटनेची स्थापना झाली होती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in