श्रीराम मंदिराच्या ध्वजारोहणाला पाकचा विरोध; संयुक्त राष्ट्रांना केले आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली, त्यावरून पाकिस्तानने गरळ ओकली आहे. ही बाब भारतातील मुस्लिम समाज आणि सांस्कृतिक वारशासाठी धोकादायक असल्याचे सांगत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय समुदायाला याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन केले आहे.
श्रीराम मंदिराच्या ध्वजारोहणाला पाकचा विरोध; संयुक्त राष्ट्रांना केले आवाहन
श्रीराम मंदिराच्या ध्वजारोहणाला पाकचा विरोध; संयुक्त राष्ट्रांना केले आवाहन
Published on

इस्लामाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाची स्थापना करण्यात आली, त्यावरून पाकिस्तानने गरळ ओकली आहे. ही बाब भारतातील मुस्लिम समाज आणि सांस्कृतिक वारशासाठी धोकादायक असल्याचे सांगत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय समुदायाला याकडे लक्ष वेधण्याचे आवाहन केले आहे.

पाकिस्तानने म्हटले आहे की, अयोध्येतील राम मंदिराची उभारणी आणि ध्वजारोहण हे भारतातील अल्पसंख्याकांना दडपण्याचा भाग असून, मुस्लिम धार्मिक स्थळांचे जाणूनबुजून नुकसान करण्याचा प्रयत्न आहे. पाकिस्तानने बाबरी विध्वंसाचा उल्लेख करून त्याला ‘ऐतिहासिक प्रार्थनास्थळ’ असल्याचे मत व्यक्त केले आहे.

पाकिस्तानने भारतातील कथित इस्लामोफोबिया, हेट स्पीच आणि अल्पसंख्याकांवरील अत्याचारांचा उल्लेख करत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली आहे. भारतातील मशिदी आणि मुस्लीम सांस्कृतिक वारसा सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी घेण्याचेही त्यांनी आवाहन केले. पाकिस्तान आपल्या अधिकृत वक्तव्यात म्हटले आहे की, संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटनांनी इस्लामिक वारसा आणि धार्मिक तसेच सर्व अल्पसंख्यांकांच्या सांस्कृतिक अधिकारांचे रक्षण करावे. पाकिस्तानने भारत सरकारला विनंती केली की, त्यांनी देशातील मुसलमानांसह सर्व धर्मियांच्या सुरक्षेची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडावी. त्यांच्या प्रार्थना स्थळांचे आंतरराष्ट्रीय मानवी हक्काच्या नियमाअंतर्गत संरक्षण करावे.

भारतावर धार्मिक वारशाचे नुकसान केल्याचा आरोप करताना पाकिस्तान स्वतःच्या देशातील हिंदू धार्मिक स्थळांच्या स्थितीवर मौन पाळत असल्याची टीका भारतातील विविध तज्ज्ञांकडून करण्यात आली. शारदा पीठ, कराचीतील जगन्नाथ मंदिर, रावळपिंडीतील मोहन मंदिर यांसारखी अनेक ठिकाणे पडीक स्थितीत असून, अनेकांवर सरकारी किंवा स्थानिकांचा कब्जा असल्याचा आरोप हिंदू संस्थांकडून वारंवार केला जात असल्याचे भारताने म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in