पाकिस्तान निवडणुकीसाठी सज्ज; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

पाकिस्तानमध्ये यापूर्वीची निवडणूक २०१८ साली झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये पुढील निवडणूक होणे अपेक्षित होते.
पाकिस्तान निवडणुकीसाठी सज्ज; प्रचाराच्या तोफा थंडावल्या

इस्लामाबाद : गुरुवारी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी पाकिस्तान सज्ज झाला असून मंगळवारी मध्यरात्रीपासून राजकीय पक्षांच्या प्रचारावर बंदी लागू झाली आहे. तत्पूर्वी जाहीर सभा घेऊन मतदारांना आवाहन करण्यासाठी राजकीय नेत्यांची धावपळ चालली होती. पाकिस्तान निवडणूक आयोगाने मतदानाची तयारी पूर्ण केली असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सुरक्षा दले सतर्क झाली आहेत. निवडणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी आणि वार्तांकन करण्यासाठी मोठ्या संख्येने परदेशी पत्रकार आणि निरीक्षक पाकिस्तानात दाखल झाले आहेत.

पाकिस्तानमध्ये यापूर्वीची निवडणूक २०१८ साली झाली होती. त्यानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये पुढील निवडणूक होणे अपेक्षित होते. पण राजकीय अस्थिरता आणि जनगणनेमुळे ती लांबणीवर पडली. आता गुरुवारी (८ फेब्रुवारी रोजी) पाकिस्तानी जनता मतदान करणार आहे. पाकिस्तानची लोकसंख्या सध्या २४ कोटींच्या आसपास असून त्यापैकी १२ कोटी ७० लाख नागरिक मतदानासाठी पात्र आहेत. गुरुवारी सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने देशभरातील मतदान केंद्रांवर २६० दशलक्षहून अधिक मतपत्रिका वितरीत केल्या आहेत. देशाच्या नॅशनल असेंब्लीत (संसद) २६६ जागा असून त्यासाठी यंदा ४४ राजकीय पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.

इम्रान खान यांच्या पक्षावर निर्बंध

इम्रान खान यांना तोशखाना आणि सायफर प्रकरणात १४ आणि १० वर्षांची शिक्षा झाल्याने ते तुरुंगात आहेत. त्यांच्या पक्षाचे क्रिकेटची बॅट हे चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवले आहे. इम्रान आणि बुशरा बीबी यांचे लग्न अवैध ठरवून त्यांना आणखी ७ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. लाहोरमधून निवडणूक लढवणा उमेदवार डॉ. यास्मीन रशीद यांच्यावर मंगळवारी दहशतवादाचे आरोप करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in