Iran vs US-Israel War : पाकच्या मध्यस्थीबाबत इराणमध्ये नाराजी

इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका पार पाडत असून आता पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
Iran vs US-Israel War : पाकच्या मध्यस्थीबाबत इराणमध्ये नाराजी
Iran vs US-Israel War : पाकच्या मध्यस्थीबाबत इराणमध्ये नाराजी
Published on

तेहरान : इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या चर्चेत पाकिस्तान मध्यस्थीची भूमिका पार पाडत असून आता पाकिस्तानच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. एका इराणी खासदाराने सुरू असलेल्या प्रादेशिक वाटाघाटींमध्ये मध्यस्थ म्हणून पाकिस्तानच्या भूमिकेवर गंभीर शंका उपस्थित केली असून, राजनैतिक टप्प्यावर तटस्थतेविषयी चिंता दर्शवली आहे. दश्तेस्तानचे प्रतिनिधित्व करणारे आणि इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण आयोगाचे प्रवक्ते असलेले इब्राहिम रझाई म्हणाले की, मध्यस्थीसाठी आवश्यक असलेली विश्वासार्हता पाकिस्तानकडे नाही. एका निवेदनात त्यांनी पाकिस्तानला चांगला मित्र आणि शेजारी म्हटले, परंतु तो एक योग्य मध्यस्थ नाही आणि अमेरिकेच्या हितांशी जुळवून घेण्याकडे त्याचा कल असतो, असा युक्तिवादही केला. मध्यस्थ निष्पक्ष असला पाहिज, तो नेहमीच एका बाजूला झुकलेला नसावा. असे ते पुढे म्हणाले.

Iran vs US-Israel War : पाकच्या मध्यस्थीबाबत इराणमध्ये नाराजी
इराणचे परराष्ट्र मंत्री परत पाकिस्तान दौऱ्यावर

पाकचा दौरा यशस्वी, अराघची यांचा दावा

इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची सोमवारी रशियात दाखल झाले असून, त्यांनी आपला पाकिस्तान दौरा अत्यंत 'उत्पादक' आणि 'यशस्वी' असल्याचे म्हटले आहे. पश्चिम आशियातील युद्ध थांबवण्यासाठी होणाऱ्या शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीबाबत अनिश्चितता असताना अराघची यांनी पाकिस्तानच्या सर्वोच्च नेतृत्वाशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. गेल्या तीन दिवसांतील आपल्या दुसऱ्या पाकिस्तान दौऱ्यात अराघची यांनी रविवारी संध्याकाळी पाकिस्तानचे लष्करप्रमुख फिल्ड मार्शल असीम मुनीर यांची भेट घेतली. या भेटीनंतर सेंट पीटर्सबर्ग येथे पोहोचल्यावर त्यांनी आपल्या टेलिग्राम चॅनेलवर एक व्हिडिओ संदेश जारी केला.

logo
marathi.freepressjournal.in