Pakistan : घटनादुरुस्तीच्या निषेधार्थ पाकमध्ये दोन न्यायाधीशांचा राजीनामा

Pakistan : घटनादुरुस्तीच्या निषेधार्थ पाकमध्ये दोन न्यायाधीशांचा राजीनामा

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने बंड केले आहे. मन्सूर अली शाह आणि अतहर मिनाल्लाह या दोन वरिष्ठ न्यायाधीशांनी घटनादुरुस्तीच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे.
Published on

इस्लामाबाद : पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने बंड केले आहे. मन्सूर अली शाह आणि अतहर मिनाल्लाह या दोन वरिष्ठ न्यायाधीशांनी घटनादुरुस्तीच्या निषेधार्थ राजीनामा दिला आहे.

न्यायाधीशांनी राजीनामा पत्रांमध्ये म्हटले आहे की, मुनीर यांना कायदेशीर कारवाईपासून संरक्षण देणे आणि त्यांना संरक्षण प्रमुख म्हणून नियुक्त करणे हे संविधानाचे उल्लंघन आहे. त्यांनी २७ व्या घटनादुरुस्तीला विरोध केला.

पाकिस्तानात लवकरच आणखी दोन किंवा तीन न्यायाधीश राजीनामा देण्याची शक्यता आहे. लष्करप्रमुखांना अमर्याद अधिकार देणाऱ्या घटनादुरुस्तीने लोकशाहीच्या इतर स्तंभांना कमकुवत केले आहे, असे सर्वोच्च न्यायालयाचे मत आहे.

पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीशांसह १६ न्यायाधीश आहेत. सध्या इतर नऊ पदे रिक्त आहेत. दोन न्यायाधीशांच्या राजीनाम्यानंतर सर्वोच्च न्यायालयात आता फक्त १४ न्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे अनेक अधिकार राष्ट्रपतींकडे सोपवण्यात आले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in