आमचा देश दत्तक घ्याल; पाकिस्तानी ब्लॉगरचे नरेंद्र मोदींना साकडे

सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडीओमध्ये तारीक भट पाकिस्तानची तुलना भारताशी करताना दिसत आहे.
आमचा देश दत्तक घ्याल; पाकिस्तानी ब्लॉगरचे नरेंद्र मोदींना साकडे

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद काही नवा नाही. असे असले तरी सध्या पाकिस्तान कमालीच्या आर्थिक संकटातून जात आहे. या देशाची अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. पाकिस्तानला पुन्हा उभे करण्यासाठी आता कोणीतरी मदतीचा हात द्यावा, असे तिथल्या जनतेलाच वाटू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानमधील सुप्रसिद्ध ब्लॉगर आणि उद्योजक तारीक भट याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात तारीक भट हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाकिस्तानला दत्तक घेण्याची विनंती करत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे.

सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडीओमध्ये तारीक भट पाकिस्तानची तुलना भारताशी करताना दिसत आहेत. "काश्मीरचा प्रश्न सोडून द्या. काश्मिरी लोक अशा देशात आहेत, जो देश लवकरच संपूर्ण जगावर राज्य करेल. भारत अमेरिका, ब्रिटनसह प्रगत देशांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. त्याच्याकडे जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे. व्यापार, माहिती तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उत्पादनांमध्ये नव्या गोष्टी आणण्याचा भारत प्रयत्न करत आहे. भारतीयांना विकासाचे वेड लागले आहे. परंतु, पाकिस्तान गुलामीत अडकला आहे. इथल्या लोकांना बिर्याणी आणि कबाबची चव कशी वाढवायची, याची चिंता सतावत आहे."

"भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आमचा देश दत्तक घ्यावा. भारताची अर्थव्यवस्था पाहा. तिथल्या लोकांचे राहणीमान बघा. आणि आपण गरीब म्हणून सारे जग आपल्याकडे बघते. आपण फक्त काश्मीर पाकिस्तानमध्ये कधी येणार, याचाच विचार करताना दिसत आहेत. आपण गरिबीतच मरणार आहोत. आपल्या पुढल्या पिढल्या आपल्याला माफ करणार नाहीत." हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

logo
marathi.freepressjournal.in