पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; संपूर्ण गाव गडप, ३०० पेक्षा जास्त जण, ११०० हून अधिक घरे गाडली गेल्याची भीती

अद्याप बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा नेमका आकडा समजू शकलेला नाही
पापुआ न्यू गिनीमध्ये भूस्खलन; संपूर्ण गाव गडप, ३०० पेक्षा जास्त जण, ११०० हून अधिक घरे गाडली गेल्याची भीती
छायाचित्र सौ. एक्स @anwaribrahim

मेलबर्न : प्रशांत महासागराच्या दक्षिणेकडील भागात वसलेल्या पापुआ न्यू गिनीच्या दुर्गम, डोंगराळ भागातील गावात शुक्रवारी झालेल्या भूस्खलनात ३०० हून अधिक जण आणि ११०० हून जास्त घरे गाडली गेल्याची भीती व्यक्त होत आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार राजधानी पोर्ट मोरेस्बीच्या वायव्येस सुमारे ६०० किलोमीटर अंतरावरील एंगा प्रांतातील काओकलम गावात शुक्रवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास भूस्खलन झाले. त्यातील मृतांची संख्या ३०० पेक्षा जास्त असल्याची भीती आहे. अद्याप बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा नेमका आकडा समजू शकलेला नाही.

पंतप्रधान जेम्स मॅरापे यांनी सांगितले की, अधिकारी अद्याप बचावकार्य करत आहेत आणि नेमकी माहिती हाती आल्यानंतर जीवितहानीचा आकडा जाहीर करतील. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

logo
marathi.freepressjournal.in