... म्हणून उड्डाण करतच काही मिनिटामध्ये तिथेच उतरवावे लागले एअर इंडियाचे विमान

नाईलाजाने आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे
... म्हणून उड्डाण करतच काही मिनिटामध्ये तिथेच उतरवावे लागले एअर इंडियाचे विमान
Published on

एअर इंडियाच्या दिल्ली-लंडन AI-111 विमानाने लंडनसाठी उड्डाण केले. त्यानंतर एका प्रवाशाने क्रू मेंबर्ससोबत हाणामारी केली. त्यामुळे हे विमान पुन्हा एकदा दिल्लीत उतरवण्यात आले. नाईलाजाने आम्हाला हे पाऊल उचलावे लागल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. या घटनेबाबत आम्ही विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली आहे. एअर इंडियाने प्रवाशाला दिल्ली विमानतळ पोलिसांच्या ताब्यात दिल्याचे म्हटले आहे. एअर इंडियाने याप्रकरणी पत्रक जारी केले आहे. 

दिल्लीहून लंडनला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच आम्हाला ते दिल्लीत आणावे लागले, असे त्यात म्हटले आहे. कारण या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने आमच्या क्रू मेंबर्ससोबत वाद घातला होता. आम्ही या प्रवाशाला समजावले, इशारा दिला आणि लेखी इशाराही दिला. तरीही या प्रवाशाने भांडण सोडले नाही. क्रूच्या सदस्यांशी त्याचे भांडण झाले. त्यात दोघेही जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आम्ही विमान दिल्लीला परत आणले. विमान उतरल्यानंतर आम्ही प्रवाशाला सुरक्षा रक्षकांच्या ताब्यात दिले आणि त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केला. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, या विमानात 255 प्रवासी होते. 

logo
marathi.freepressjournal.in