बीजिंग : चीनमध्ये देशभक्ती शिक्षण कायदा मंजूर केला आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रात चिनी युवकांमध्ये राष्ट्रीय एकात्मता, देशभक्ती, कम्युनिस्ट पक्षाशी एकनिष्ठतेची भावना तयार करणे हा या कायद्याचा उद्देश आहे.
चिनी सरकारी मीडिया ‘शिन्हुआ’ने सांगितले की, कायदा शाळा, महाविद्यालयात देशभक्तीशी संबंधित बाबींची कायदेशीर गॉरंटी देते. देशातील काहीजण देशभक्ती विसरत आहेत. त्यामुळे त्याबाबत जागरूकता आणण्यासाठी १ जानेवारी २०२४ पासून या कायद्याची अंमलबजावणी केली जाईल.