होय, म्या मरण अनुभवले; तब्बल २८ मिनिटांनी तो झाला जीवंत

ऑस्ट्रेलियातील फील झायबेल नावाच्या ५७ वर्षीय व्यक्तीने आपले मरण पाहिले आहे.
होय, म्या मरण अनुभवले; तब्बल २८ मिनिटांनी तो झाला जीवंत

मरणानंतर माणसाचा जीव कुठे जातो, याचे कोडे आधुनिक विज्ञानाला अजून तरी उलगडलेले नाही. माणूस एकदा मेल्यानंतर त्याचे काय होते, आत्मा ही संकल्पना आहे का, असे अनेक प्रश्न आजही वादातीत आहेत. पण, मरणानंतर स्वत:चाच मृतदेह एका माणसाने पाहिला आहे. होय, हे सत्य आहे. ऑस्ट्रेलियातील फील झायबेल नावाच्या ५७ वर्षीय व्यक्तीने आपले मरण पाहिले आहे.

तायक्वांदो प्रशिक्षक असलेल्या झायबेल यांना बास्केटबॉल खेळता-खेळता हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन ते मैदानातच कोसळले. त्यांचा मुलगा जोशुआ त्यांचा खेळ पाहात होता. त्याने फोन करुन तातडीने ॲम्ब्युलन्स बोलवून आपल्या पित्याला हॉस्पीटलमध्ये नेले. अनेक दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यानच्या झायबेल यांचा मृत्यू झाला. पण, चमत्कार घडला आणि २८ मिनिटांनंतर ते पुन्हा जीवंत झाले. जीवंत झाल्यावर त्यांनी आपला मृत्यूनंतरचा अनुभव सांगितला. ही घटना गेल्या नोव्हेंबर महिन्यात घडली होती.

हिंदू, चीनी, ग्रीक या सारख्या जगातील सर्व प्राचीन मानवी संस्कृतींमध्ये मृत्यू नंतरही एक विश्व असल्याचा दृढ विश्वास आहे. त्याचे उल्लेखही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात उल्लेख केलेले आढळतात. अगदी अलिकडे सुमारे १७०० वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या इस्लामी संस्कृतीमध्ये देखील ‘जन्नत’ ही संकल्पना मांडली आहे. मृत्यूनंतर मानवी शरीर पृथ्वीतलावरच राहते. त्यावर प्रत्येक धर्माच्या प्रथेनुसार अंत्यसंस्कार केले जातात. शरिरातील प्राण मात्र अनंतात निघून जातो. हिंदू संस्कृतीत याला आत्मा म्हणतात. तो एकदा शरीरातून गेला की माणूस मृत होतो. तो पुन्हा जीवंत होत नाही. अनेकांच्या मनात आत्मा खरेाखरच असतो का, अशी शंका येते.

फील झायबेल यांनी साक्षात मृत्यू अनुभवल्यानंतर सांगितले, की ‘‘मला आता एक शिकवण मिळाली आहे. ती म्हणजे जीवनातल्या छोट्या-छोट्या समस्यांची तक्रार करु नये. शेवटी आपण काही सोबत नेऊ शकत नाही. माणूस आजारी असतांना त्याला स्वप्ने पडतात. विविध प्रकारचे भ्रम त्याला होत असतात. तसेच गाढ झोपेतून बाहेर पडतानाचा एक अर्ध निद्रावस्तेचा संधीकाळ असतो. जगविख्यात मानसशास्त्रज्ञ सायमंड फ्रॉयड यांनी देखील स्वप्नांची उकल करताना याच संधीकाळात माणूस स्वप्ने पाहतो, असे आपल्या ‘इंटरप्रिटेशन ऑफ ड्रीम्स’ या पुस्तकात लिहिले आहे. फील झायबेलचा अनुभव देखील कदाचित याच प्रकारात मोडत असावा.

स्वत:चा मृतदेह मी पाहिला

ऑस्ट्रेलियातील या घटनेने मात्र ही शंका उपस्थित करणाऱ्यांना कोड्यात टाकले आहे. फील झायबेल काही दिवसांनंतर शुद्धीत आले, तेव्हा त्यांनी आपले मरणोत्तर अनुभव सांगितले. ते म्हणाले, की मरणानंतर पांढरा प्रकाश देहातून बाहेर पडतो. किंवा देव आपल्यास दिसू लागतो, असे मी ऐकले होते. पण, मला मात्र मेल्यानंतर असे काहीच दिसले नाही. मी शरिरातून बाहेर पडलो आहे, असे मला वाटले. मी तेव्हा हवेत तरंगत होतो. एक नर्स माझ्या शरिराला पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे मला स्पष्ट दिसत होते. त्यानंतरचे आपल्यास काही आठवत नाही. माझे जीवंत होणे, हा एक दैवी चमत्कारच होता, हे मी ठामपणे सांगू शकतो. आता मी पुन्हा कराटे शिकवू लागलो आहे. मला वाटले होते की हे काम मी आता करू शकणार नाही. ’’

logo
marathi.freepressjournal.in