फिलिपीन्स आणि चीनच्या नौकांची धडक

अमेरिकेने फिलिपीन्सला पाठिंबा दर्शवत चीनच्या अरेरावीचा निषेध केला आहे
फिलिपीन्स आणि चीनच्या नौकांची धडक
Published on

मनिला : चीनच्या तटरक्षक दलाची नौका आणि फिलिपीन्सची लष्करी पुरवठा नौका यांची रविवारी दक्षिण चीन समुद्रातील थॉमस शोल या भागात धडक झाली. ही घटनेसाठी दोन्ही देशांनी एकमेकांना जबाबदार ठरवत निषेध केला आहे. अमेरिकेने फिलिपीन्सला पाठिंबा दर्शवत चीनच्या अरेरावीचा निषेध केला आहे. चीनने संपूर्ण दक्षिण चीन समुद्रावर आपला हक्क सांगत तो भाग आपल्या नकाशात दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्याला शेजारील फिलिपीन्स, मलेशिया, व्हिएतनाम, तैवान आणि ब्रुनेई आदी देशांचा विरोध आहे. थॉमस शेलबाबतही असाच वाद आहे. या प्रदेशात रविवारी दोन्ही देशांच्या नौका समोरासमोर येऊन टक्कर झाली.

logo
marathi.freepressjournal.in