मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान

मॉरिशस दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ हा मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
मोदींना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान
एक्स @narendramodi
Published on

पोर्ट लुईस : मॉरिशस दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ द इंडियन ओशन’ हा मॉरिशसचा सर्वोच्च पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. हा सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी पहिले भारतीय आहेत. कुठल्याही देशातर्फे पंतप्रधान मोदींना देण्यात येणारा हा २१ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. या सन्मानानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले की, “मॉरिशसच्या लोकांनी, इथल्या सरकारने मला आपला सर्वोच्च नागरिक

सन्मान देण्याचा निर्णय घेतला आहे. मी तुमच्या निर्णयाचा नम्रतेने स्वीकार करतो. हा भारत आणि मॉरिशसच्या ऐतिहासिक नात्याचा सन्मान आहे. हा त्या भारतीयांचा सन्मान आहे, ज्यांच्या पिढ्यांनी या भूमीची सेवा केली. या मातीमध्ये अनेक भारतीयांचा आपल्या वंशजांचा घाम मिसळलेला आहे. आपण सगळे एकच कुटुंब आहोत.”

पोर्ट लुईस येथे झालेल्या भारतीय समुदायाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोरच रामगुलाम यांनी या पुरस्काराची घोषणा केली. यानंतर मॉरिशसच्या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित केल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी रामगुलाम यांचे आभार मानले.

logo
marathi.freepressjournal.in