पोलंडचे नवे पंतप्रधान डोनाल्ड टस्क शपथविधी संपन्न

टस्क यांच्या सरकारने संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. त्यानंतर टस्क यांनी पाश्चिमात्य देशांना युक्रेन पाठिंबा कायम ठेवण्याचे आवाहन केले.
पोलंडचे नवे पंतप्रधान डोनाल्ड टस्क शपथविधी संपन्न
PM

वार्सा: पोलंडच्या पंतप्रधानपदावर डोनाल्ड टस्क यांची नियुक्ती झाली असून बुधवारी सकाळी राष्ट्रपतींनी  समक्ष त्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. टस्क यांच्या अन्य मंत्र्यांचाही शपथविधी सोहळा यावेळी संपन्न झाला. वार्सा येथील राष्ट्रपती भवनात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यामुळे आता राष्ट्रीय पुरोगामी पक्षाची सत्ता संपुष्टात आली आहे.

१५ ऑक्टोबर रोजी या देशात निवडणूक घेण्यात आली होती. त्यात विरोधी आघाडी पक्षांचा विजय झाला. टस्क यांचे सहकारी सोहळ्यासाठी बस मध्ये बसून आले. त्यांनी पोलिश ध्वजातील पांढऱ्या आणि लाल रंगाची वस्त्रे परिधान केली होती. बसमधून उतरताच त्यांनी निवडून दिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानले. जनतेने देखील त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले. मंगळवारी टस्क यांच्या सरकारने संसदेत विश्वासदर्शक ठराव जिंकला होता. त्यानंतर टस्क यांनी पाश्चिमात्य देशांना युक्रेन पाठिंबा कायम ठेवण्याचे आवाहन केले.

logo
marathi.freepressjournal.in