मोदींच्या नेतृत्वामुळे सकारात्मक बदल; चीनने केले भारताचे कौतुक

मी भारताच्या दुसऱ्यांदा दौऱ्यावर गेलो. मी ४ वर्षांपूर्वी भारतात गेलो होतो. भारतात देशात व परदेशी नीती पूर्णपणे बदलली आहे.
मोदींच्या नेतृत्वामुळे सकारात्मक बदल; चीनने केले भारताचे कौतुक

बीजिंग : भारत हा ताकदवान देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या आर्थिक व परदेश धोरणात मोठे सकारात्मक बदल झाले आहेत. भारत वेगाने पुढे जात आहे, असे कौतुक चीनने केले आहे.

‘ग्लोबल टाइम्स’ने फुडान विद्यापीठाचे सेंटर फॉर साऊथ एशियन स्टडीजचे संचालक झांग जियाडोंग यांचा लेख प्रसिद्ध झाला.

त्यात त्यांनी नमूद केले की, भारत हा आता रणनीतीरूपाने जास्त आत्मविश्वासाने भरला आहे. भारत आता मजबुतीने पुढे जात आहे. भारत हा जगासाठी महत्त्वाचा देश बनला आहे. जागतिक व्यापार, संस्कृती, अर्थशास्त्र व राजकारणासहित विविध क्षेत्रात वेगाने पुढे जात आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने सर्वच क्षेत्रात आपला दृष्टिकोन व्यापक केला आहे, असे ते म्हणाले.

मी भारताच्या दुसऱ्यांदा दौऱ्यावर गेलो. मी ४ वर्षांपूर्वी भारतात गेलो होतो. भारतात देशात व परदेशी नीती पूर्णपणे बदलली आहे. भारताने आर्थिक विकास व सामाजिक शासनात चांगली कामगिरी केली. स्वप्नातून वास्तवतेला भिडणारे धोरण भारताने तयार केले, असे त्यांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in