मॉस्को : रशियातील कामचटका भागाला शुक्रवारी पुन्हा भूकंपाचा धक्का बसला. हा भूकंप ७.८ रिश्टर स्केल क्षमतेचा होता. या भूकंपानंतर त्सुनामीचा ॲलर्ट देण्यात आला आहे. भूकंपामुळे घरातील फर्निचर, कार, लाइट हलताना दिसत होती.
गेल्या आठवड्यातही रशियाला भूकंपाचे मोठे धक्के बसले होते. तेव्हा कामचटका भागात भूकंपाची तीव्रता ७.४ रिश्टर स्केल इतकी होती. कामचटका विभागाचे गव्हर्नर व्लादिमीर सोलोदोव यांनी सांगितले की, पूर्व किनारपट्टीवर त्सुनामीचा धोका आहे. सुदैवाने या भूकंपात कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.