युक्रेनमध्ये तात्काळ शस्त्रसंधी उपलब्ध करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आव्हान

युक्रेनमध्ये तात्काळ शस्त्रसंधी उपलब्ध करण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले आव्हान

युक्रेनमध्ये तात्काळ शस्त्रसंधी करण्यात यावी व हा पेच सोडवण्यासाठी चर्चा व राजनैतिक मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. यावेळी डेन्मार्कचे पंतप्रधान मेट्टे फ्रेडरिकसेन यांनी आशा व्यक्त केली की, भारत रशियाशी असलेल्या आपल्या चांगल्या संबंधांचा वापर करुन युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी प्रयत्न करेल.

फ्रेडरिकसेन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना मोदी म्हणाले की, आपण युक्रेन समस्येवर चर्चा केली व युक्रेनमध्ये तात्काळ शस्त्रसंधी करण्यात यावी, असे आवाहन केले आहे. युक्रेनमधील युद्ध हे चर्चा व राजनैतिक मार्गाचा अवलंब करूनच सोडवता येऊ शकतो, असे ते म्हणाले.

फ्रेडरिकसेन म्हणाले की, भारताने रशियावरील आपल्या प्रभावाचा वापर करुन रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना युद्ध थांबवून नागरिकांचे हत्याकांड थांबवण्याचे आवाहन करावे. पुतिन यांनी हे युद्ध थांबवावे, असा माझा स्पष्ट संदेश आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा

दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांमध्ये विविध क्षेत्रातील भागीदारीबाबत यावेळी चर्चा झाली. दोन्ही देशांमधील हरित क्षेत्रातील धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच कौशल्य विकास, हवामान, अपारंपारिक ऊर्जा आदी क्षेत्रातील व्यापक सहकार्याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.

Related Stories

No stories found.