कॅनडात खलिस्तानी समर्थकांची निदर्शनं ; भारतीय समुदायाच्या लोकांचा तिरंगा घेत भारताला पाठिंबा

कॅनडातील भारतीय दुतावासाबाहेर ही निदर्शनं करण्यात आली
कॅनडात खलिस्तानी समर्थकांची निदर्शनं ; भारतीय समुदायाच्या लोकांचा तिरंगा घेत भारताला पाठिंबा

गेल्या काही दिवसांपूर्वी पंजाबमधील 'वारिस पंजाब दे' या खलिस्तानी संघटनेचा मोरक्या अमृतपाल सिंग याच्या नेतृत्वा खलिस्तान समर्थकांनी पुन्हा डोक वर काढायला सुरुवात केली होती. त्यामुळे वेगळ्या खलिस्तानच्या मागणाला जोर आला होता.

अमृतपाल सिंगने देशभरातील पोलिसांना कामाला लावले होते. काही दिवस भूमिगत झाला असल्याने त्याला शोधनं पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होतं. अखेर पोलिसांनी पंजाबमधून अमृतपालल अटक केल्यानंतर वातावरण शांत झालं.

अधूनमधून वेगळ्या खलिस्थानची मागणी जोर धरत असते. यासाठी अनेकदा निर्दशनं केल्याचंही निदर्शनास येते. आता कॅनडातील टोरंटो येथील भारतीय वाणिज्य दूतावासासमोर 8 जुलै रोजी खलिस्थानी समर्थकांनी निदर्शने केल्याचं समोर आलं आहे. तसंच यावेळी खलिस्थानी समर्थकांकडून तिरंग्याचा अवमान देखील करण्यात आला.

यानंतर भारतीय समुदायाचे लोकही भारताच्या समर्थनार्थ तिरंगा घेऊन भारतीय वाणिज्य दुतावासाबाहेर पोहचले. यावेळी खलीस्तानी समर्थक भारतीय दुतावासाबाहेर निदर्शनं करत असताना, भारतीय समुदायाचे लोक तिरंगा घेऊन त्याठिकाणी पोहचले आणि त्यांनी भारताला पाठिंबा दर्शववला. तसंच खलिस्थान समर्थकांवर आक्षेप घेतला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in