बोईंग ७३७ मॅक्स विमानाच्या उत्पादनावर बंदी; अमेरिकेच्या फेडरल विमान प्रशासकाचा निर्णय

बोईंग ७३७ मॅक्स विमानाच्या उत्पादनावर बंदी; अमेरिकेच्या फेडरल विमान प्रशासकाचा निर्णय

कंपनीने या विमानातील सर्व त्रूटी दूर केल्या पाहिजेत.

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या फेडरल विमान प्रशासकाने (एफएए) वादग्रस्त बोईंग ७३७ मॅक्स विमानाच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. या निर्णयाचा परिणाम भारताच्या विमान कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. एअर इंडिया एक्स्प्रेस, स्पाईसजेट व अकासा एअरने बोईंगला ५२७ विमानांची ऑर्डर दिली आहे.

तीन आठवड्यापूर्वी अलास्का एअरलाईन्सच्या विमानाचा दरवाजा उडाला होता. तरीही वैमानिकाने विमान सुरक्षित लँडिंग केले. यात प्रवाशांना किरकोळ इजा झाली. या घटनेनंतर बोईंगला आपल्या दर्जा नियंत्रण यंत्रणेच्या चौकशीचा सामना करावा लागला. रंतणेचरा चौकिीचा सािना करावा लागला. लासका एअरलाईनसची ही दुर्घटना बोईंगसाठी परीचलनातील अडचणी दर्शवत आहे. २०१८ व २०१९मध्ये ७३७ मॅक्स ८ विमानाच्या दोन दुर्घटना झाली. त्यात ३४६ जणांचा बळी गेला होता. त्यानंतर या विमानांचे उड्डाण रोखण्यात आले.

७३७ मॅक्स विमानांच्या उत्पादनाचा विस्तार नाही

अमेरिकेच्या हवाई व्यवसायावर नियंत्रण ठेवणाऱ्या ‘फेडरल हवाई प्रशासना’ने सांगितले की, बोईंग वादग्रस्त ७३७ मॅक्स विमानांच्या उत्पादनाचा विस्तार करू शकत नाही. कंपनीने या विमानातील सर्व त्रूटी दूर केल्या पाहिजेत. आम्ही उत्पादनाच्या विस्तारासाठी बोईंगच्या कोणत्याही विनंतीचा विचार करणार नाही. आम्ही ७३७ मॅक्सच्या अतिरिक्त उत्पादन साखळीला मंजुरी देणार नाही. दर्जा नियंत्रणाच्या सर्व मुद्यांचे निराकरण होत नाही, तोपर्यंत परवानगी मिळणार नाही, असे प्रशासनाने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in