पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराचे पाकिस्तानमध्ये अपहरण

भारताच्या गृह मंत्रालयाने एप्रिल २०२२ मध्ये मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीरला दहशतवादी घोषित केले होते.
पुलवामा हल्ल्याच्या सूत्रधाराचे पाकिस्तानमध्ये अपहरण

इस्लामाबाद : जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख दहशतवादी आणि जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे २०१९ साली केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीर याचे पाकिस्तानमध्ये अपहरण झाल्याचे वृत्त आले आहे. हाफिजाबादमधील डेरा हाजी गुलाम येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी जात असताना ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपहरण करणाऱ्या अज्ञात कारचालकांचा शोध लागलेला नाही.

भारताच्या गृह मंत्रालयाने एप्रिल २०२२ मध्ये मोहिउद्दीन औरंगजेब आलमगीरला दहशतवादी घोषित केले होते. त्याने पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या नियोजन आणि अंमलबजावणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या ४० हून अधिक जवानांचा मृत्यू झाला होता.

logo
marathi.freepressjournal.in