पुतीन-झेलेन्स्की यांची तुर्कीत होऊ शकते भेट शांतता चर्चेनंतर रशियन अधिकाऱ्याचा दावा पण शस्त्रसंधीवर अद्याप एकमत नाही

पुतीन-झेलेन्स्की यांची तुर्कीत होऊ शकते भेट
शांतता चर्चेनंतर रशियन अधिकाऱ्याचा दावा 
पण शस्त्रसंधीवर अद्याप एकमत नाही

रशिया-युक्रेनमधील युद्ध ३४ व्या दिवशीही सुरू आहे. दुसरीकडे, या संकटावर राजकीय तोडगा काढण्याचाही प्रयत्न सुरू आहे. रशिया-युक्रेनच्या शिष्टमंडळात तुर्कीची राजधानी इस्तंबूलमध्ये सुरू असलेली शांतता चर्चा मंगळवारी सायंकाळी संपुष्टात आली. या चर्चेत शस्त्रसंधीच्या मुद्यावर मतैक्य झाले नाही. पण, रशियन अधिकाऱ्यांनी ही बैठक सकारात्मक झाल्याचा दावा केला. विशेषतः एका अधिकाऱ्याने रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन व युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांची तुर्कीत लवकरच भेट होण्याची शक्यता व्यक्त केल्याने गत महिन्याभरापासून सुरू असलेल्या या युद्धाची वाटचाल आता तहाच्या दिशेने सुरू झाल्याचा दावा केला जात आहे.

दरम्यान, मंगळवारच्या शांतता चर्चेपूर्वी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी युक्रेन तटस्थ देश बनण्यास तयार आहे, असे जाहीर केले.

झेलेन्स्कींचे पुतीन यांना पत्र

युक्रेन युद्धावर पडद्यामागूनही तोडगा शोधला जात आहे. रशियन अब्जाधीश आणि चेल्सी फुटबॉल क्लबचे मालक रोमन अब्रामोव्हिच सोमवारी झेलेन्स्की यांचे पत्र घेऊन पुतीनपर्यंत पोहोचले. या पत्रात झेलेन्स्कींनी युद्ध कशा पद्धतीने थांबवता येईल यावर भाष्य केले होते. त्यावर संतापलेल्या पुतीन यांनी युक्रेनला उद्ध्वस्त करण्याचा इशारा दिला. त्यानंतर अमेरिकेने पुतीन समेट घडवून आणण्याच्या मन:स्थितीत नसल्याचा आरोप केला.

ब्रिटन युक्रेनला देणार

स्टार स्ट्रीक प्रणाली

ब्रिटन युक्रेनला स्टार स्ट्रीक प्रणाली देणार आहे. रशियाने आण्विक हल्ल्याची धमकी दिल्यानंतर ब्रिटनने हा निर्णय घेतला आहे. तर युक्रेनच्या सर्वात मोठ्या दूरसंचार सेवा देणाऱ्या कंपनीवर सायबर हल्ला झाला आहे.​​​​​​​

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in