

दुबई : कतारचे माजी शासक शेख हमद बिन खलिफा अल थानी यांचे निधन झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. कतारचे शासक म्हणून त्यांनी कतार या चिमुकल्या देशाला मुत्सद्देगिरी, माध्यम आणि गुंतवणुकीच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर एक प्रमुख देश म्हणून स्थान मिळवून दिले.
जून २०१३ मध्ये १८ वर्षे ‘अमीर’ म्हणून काम केल्यानंतर पद सोडणारे शेख हमद हे ऊर्जा-समृद्ध कतारच्या त्या अद्भूत महत्त्वाकांक्षेचे शिल्पकार होते. त्यांनी मागास कतारला आंतरराष्ट्रीय केंद्र बनवले. कतारकडे लंडनमधील प्रसिद्ध ‘हॅरॉड्स’ डिपार्टमेंटल स्टोअरची मालकी आहे आणि त्यांनीच शक्तिशाली ‘अल जजिरा’ सॅटेलाइट न्यूज नेटवर्कची स्थापना केली होती.कतारची राजकीय ताकद आज उत्तर आफ्रिकेपासून अफगाणिस्तानपर्यंत पसरलेली आहे. कतारने विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली होती.
भारतात एक दिवसाचा दुखवटा
कतारचे प्रमुख शेख हमद बिन खलिफा अल-थानी यांच्या निधनानिमित्त आदरांजली म्हणून केंद्र सरकारने सोमवारी एक दिवसाचा राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे.