भारताने दुसरे चीन बनण्याचे स्वप्न सोडावे; RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा

भारताने उत्पादन क्षेत्रातील ‘दुसरा चीन’ बनण्याचे स्वप्न सोडावे, असा इशारा आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.
भारताने दुसरे चीन बनण्याचे स्वप्न सोडावे; RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा इशारा
Published on

वॉशिंग्टन : भारताने उत्पादन क्षेत्रातील ‘दुसरा चीन’ बनण्याचे स्वप्न सोडावे, असा इशारा आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला आहे.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत राजन म्हणाले की, सध्याच्या जगात आणखी एका चीनला जागा नाही. जागतिक उत्पादन क्षेत्र वेगाने स्वयंचलित व संरक्षणवादी होत आहे. चीन, व्हिएतनाम आदी देशांनी कमी वेतनात आणि चांगल्या पायाभूत सुविधा उभारल्या आहेत. त्यामुळे तेथे उत्पादन क्षेत्र चांगले विकसित झाले आहे. जुळणीसारख्या कमी कौशल्य लागणाऱ्या विभागातही मशीनचा वापर होत आहे. कंपन्यांना मशीनची देखभाल करणाऱ्या लोकांची गरज आहे. कंपन्यांना आता मशीनची कामे मानवी हातांनी करण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, जागतिक उत्पादन राष्ट्रवाद वाढला आहे. प्रत्येक देशाला आपले उत्पादन क्षेत्र लहान हवे आहे. आता उत्पादन क्षेत्र जास्त नोकऱ्या निर्माण करू शकत नाही, असे त्यांनी सांगितले.

भारत आपल्या आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण काळातून जात आहे. ते म्हणाले की, भारताने आपल्या तरुण लोकसंख्येचा वापर केला पाहिजे. भारताचा ६ व ६.५ टक्के विकास दर अत्यंत अपुरा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in