‘आयएमओ’ मंडळावर भारताची फेरनिवड

‘आयएमओ’ मंडळावर भारताची फेरनिवड

गतवेळी भारताला १३३ मते मिळाली होती. भारतासह ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांची काऊन्सिलवर निवड झाली आहे.
Published on

लंडन : जागतिक सागरी व्यापाराचे नियमन करणाऱ्या इंटरनॅशनल मेरीटाइम ऑर्गनायझेशन ( आयएमओ) काऊन्सिलवर भारताची फेरनिवड झाली आहे. भारताच्या लंडनमधील उच्चायुक्तालयाने त्याबद्दल सदस्य देशांचे आभार मानले आहेत.

इंटरनॅशनल मेरीटाइम ऑर्गनायझेशन ( आयएमओ) ही संयुक्त राष्ट्रांची संस्था असून ती जागतिक सागरी व्यापाराचे नियमन करते. संयुक्त राष्ट्रांच्या १९४८ सालच्या जिनिवा येथील बैठकीनंतर तिची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेच्या मंडळावर भारताची यंदा फेरनिवड झाली आहे. त्यासाठी शनिवारी लंडन येथे झालेल्या मतदानात भारताला १६७ सदस्यांपैकी १५७ देशांची विक्रमी मते मिळाली. गतवेळी भारताला १३३ मते मिळाली होती. भारतासह ऑस्ट्रेलिया, ब्राझिल, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड्स, स्पेन, स्वीडन आणि संयुक्त अरब अमिराती (यूएई) या देशांची काऊन्सिलवर निवड झाली आहे.

logo
marathi.freepressjournal.in