चीनमध्ये १४० वर्षांतील विक्रमी पाऊस

गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाचा देशातील १३० दशलक्ष नागरिकांवर परिणाम झाला
चीनमध्ये १४० वर्षांतील विक्रमी पाऊस

बीजिंग : बीजिंग परिसरात गेल्या काही दिवसांत झालेला पाऊस हा १४० वर्षांतील विक्रमी होता, अशी माहिती चीनच्या हवामान खात्याने बुधवारी दिली. चीनमध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या वादळी पावसात किमान २० जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. पुरातून वाचवण्यासाठी हजारो नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

चीनमध्ये शास्त्रीय पद्धतीने हवामानाच्या नोंदी ठेवण्यास १४० वर्षांपासून सुरुवात झाली. तेव्हापासूनचा हा सर्वांत जोरदार पाऊस असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. बीजिंग परिसरात संपूर्ण जुलै महिन्यात सामान्यपणे जितका पाऊस पडतो, तितका पाऊस यंदा केवळ ४० तासांत पडला. यंदा चांगपिंग येथे सर्वाधिक ७४४.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यापूर्वीचा उच्चांक १८९१ साली ६०९ मिमी पावसाचा होता.

गेल्या आठवड्यात पडलेल्या पावसाचा देशातील १३० दशलक्ष नागरिकांवर परिणाम झाला. बीजिंग आणि आसपासच्या प्रदेशातूनच ९,७४,४०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले. याशिवाय शांक्सी प्रांतातून ४२,२११ जणांचे स्थलांतर करण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in