
न्यूयॉर्क : मुंबई २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन उद्योगपती तहव्वूर राणा याला भारताकडे सोपवण्यास अमेरिकन न्यायालयाने नकार दिला आहे. तहव्वूर राणाने भारतात प्रत्यार्पण करण्याच्या याचिकेला न्यायालयात आव्हान दिले होते. अमेरिकेतील न्यायालयाने बायडन सरकारचे अपील रद्दबातल ठरवले. या निर्णयामुळे भारताला मोठा धक्का बसला आहे.
२ ऑगस्ट रोजी कॅलिफोर्नियातील जिल्हा न्यायाधीश डेल फिशर यांनी राणाचे जामीनाचे अपील फेटाळून लावले होते. त्याविरोधात राणा याने नवव्या सर्किट कोर्टात याचिका दाखल केली. राणा याच्या प्रत्यार्पणाला मान्यता देऊ नये, अशी विनंती अमेरिकन सरकारने कोर्टाला केली हेाती. मात्र, जिल्हा न्यायाधीशांनी सरकारची विनंती फेटाळली.