९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका

इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध रविवारी थांबले. इस्रायलने ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे.
९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका
Published on

तेल अवीव : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध रविवारी थांबले. इस्रायलने ९० पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे. तत्पूर्वी, हमासने इस्रायलच्या तीन अपहृत महिलांची सुटका केली.

हे तीन अपहृत परत आल्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू म्हणाले की, संपूर्ण देश तुमच्या गळ्यात गळे घालताना दिसत आहे. या सुटकेनंतर पॅलेस्टाईन व इस्रायलमध्ये लोकांनी आनंद साजरा केला. शस्त्रसंधीनंतर ६०० हून अधिक ट्रक मदत घेऊन गाझात पोहचले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in