विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजची सुटका

अमेरिकेतील हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांची ५ वर्षांनंतर मंगळवारी लंडन तुरुंगातून सुटका करण्यात आली.
विकिलिक्सचे संस्थापक ज्युलियन असांजची सुटका
AFP
Published on

न्यूयॉर्क : अमेरिकेतील हेरगिरीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले ‘विकिलिक्स’चे संस्थापक ज्युलियन असांज यांची ५ वर्षांनंतर मंगळवारी लंडन तुरुंगातून सुटका करण्यात आली. अमेरिकन सरकारशी झालेल्या कराराचा भाग म्हणून त्याने हेरगिरी केल्याची कबुली दिली आहे. या करारानुसार, आरोप मान्य केल्यानंतर असांजला ६२ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाईल, जी त्याने आधीच भोगली आहे. ज्युलियनने आतापर्यंत ब्रिटिश तुरुंगात १,९०१ दिवसांची शिक्षा भोगली आहे. या करारानंतर लंडन उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.

logo
marathi.freepressjournal.in