पॅलेस्टिनच्या पंतप्रधानांचा राजीनामा

हमास-इस्रायल युद्धापूर्वी पॅलेस्टीनच्या गाझा पट्टी भागात हमासचे आणि पश्चिम तीर (वेस्ट बँक) भागात मोहम्मद श्तायेह यांच्या सरकारचे शासन होते
पॅलेस्टिनच्या पंतप्रधानांचा राजीनामा

जेरुसलेम : पॅलेस्टिनी पंतप्रधान मोहम्मद श्तायेह यांनी सोमवारी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. आपल्या राजीनाम्यामुळे अमेरिकेच्या पाठिंब्याने होऊ घातलेल्या सुधारणांचा मार्ग मोकळा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

पॅलेस्टिनी पंतप्रधान मोहम्मद श्तायेह यांनी स्वत:च्या पदासह संपूर्ण सरकारचा राजीनामा सादर केला आहे. पॅलेस्टीनचे अध्यक्ष महमूद अब्बास तो स्वीकारतात की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अब्बास हे पंतप्रधानांचा राजीनामा स्वीकारून सरकार बरखास्त करतील आणि पॅलेस्टीन इन्व्हेस्टमेंट फंडाचे अध्यक्ष मोहम्मद मुस्तफा यांची पुढील पंतप्रधान म्हणून निवड करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

हमास-इस्रायल युद्धापूर्वी पॅलेस्टीनच्या गाझा पट्टी भागात हमासचे आणि पश्चिम तीर (वेस्ट बँक) भागात मोहम्मद श्तायेह यांच्या सरकारचे शासन होते. हमास-इस्रायल युद्ध संपल्यानंतर वेस्ट बँक आणि गाझा पट्टीवर शासन करण्यासाठी सुधारित पॅलेस्टिनी प्राधिकरण नेमण्याची अमेरिकेची योजना आहे. पण ती अंमलात आणण्यात अनेक अडथळे आहेत. पुढील टप्प्यात नवीन सरकारी आणि राजकीय व्यवस्था अस्तित्वात आणणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने सध्याचे पॅलेस्टिनी सरकार बरखास्त होणे, ही पहिली पायरी ठरू शकते.

logo
marathi.freepressjournal.in