उन्हाच्या फटक्यामुळे महागाई वाढण्याचा धोका

उन्हाच्या फटक्यामुळे महागाई वाढण्याचा धोका

भारतात यंदा उष्णतेची मोठी लाट आली होती. अनेक शहरातील तापमान ४३ ते ४९पर्यंत होते. जनतेला उष्णतेचा ताप सहन करावा लागत आहे. या वाढत्या उन्हाच्या फटक्यामुळे महागाई वाढण्याचा धोका आहे, असा इशारा जागतिक पतमान संस्था मुडीजने दिला आहे.

‘मुडीज’ने सोमवारी आपला अहवाल जारी केला आहे. अधिक तापमान दीर्घकाळ राहणे हे भारतासाठी नुकसानकारक आहे. कारण त्यामुळे महागाई वाढू शकते व भारताचा विकास दर घटू शकतो. भारताला वातावरण बदलाचा मोठा फटका बसत आहे.

भारतात मार्च ते मेपर्यंत कडक उष्णता असते. मात्र, यंदा दिल्लीमध्ये पाचवी लाट पाहायला मिळाली. त्यात ४९ अंश तापमान नोंदवले गेले. देशात असेच तापमान वाढ राहिल्यास गव्हाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. तसेच वीज कपातीला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे महागाई वाढून व विकासदराचा संकटाचा सामना करावा लागू शकतो. सरकारने भीषण उष्णता पडल्यानंतर सापडल्यामुळे जून २०२२ मध्ये संपणाऱ्या ५.४ टक्क्याने घटवून १५ कोटी टन केले आहे. कमी उत्पादन आणि जागतिक स्तरावर गव्हाची मागणी कारणे गहू निर्यातीवर बंदी घातली आहे न्यू क्रेन सैन्य संघर्ष सुरू असताना भारत हा वैश्विक मागणी पूर्ण करण्यास सक्षम होऊ शकला असता; मात्र भारतातले उत्पादन कमी होणार असल्याने भारताने गावाच्या निर्यातीवर बंदी केली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in