रॉबर्ट हॉल, मायकेल वूडफर्ड यांना अर्थशास्त्राचे नोबेल

रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने सोमवारी २०२६ चा 'अर्थशास्त्रातील सेवेरिग्स रिझ बँक पुरस्कार' (अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक) स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे रॉबर्ट ई. हॉल आणि कोलंबिया विद्यापीठाचे मायकेल वूडफर्ड यांना जाहीर केला आहे.
रॉबर्ट हॉल, मायकेल वूडफर्ड यांना अर्थशास्त्राचे नोबेल
रॉबर्ट हॉल, मायकेल वूडफर्ड यांना अर्थशास्त्राचे नोबेल (Photo-X)
Published on: 

स्टॉकहोम : रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने सोमवारी २०२६ चा 'अर्थशास्त्रातील सेवेरिग्स रिझ बँक पुरस्कार' (अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक) स्टॅनफोर्ड विद्यापीठाचे रॉबर्ट ई. हॉल आणि कोलंबिया विद्यापीठाचे मायकेल वूडफर्ड यांना जाहीर केला आहे. ‘मॅक्रो इकोनॉमिक स्थिरीकरणाचा सूक्ष्म आर्थिक पाया’ या विषयावरील त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी हा बहुमान देण्यात आला आहे.

रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसने 'एक्स'वर पोस्ट करत म्हटले की, हॉल आणि वूडफर्ड यांनी विकसित केलेल्या आर्थिक मॉडेलमुळे सरकार आणि मध्यवर्ती बँकांना प्रभावी स्थिरीकरण धोरणे राबवणे अधिक सुलभ झाले आहे. या पुरस्काराचे स्वरूप १२ दशलक्ष स्वीडिश क्रोनर इतके असून, ही रक्कम दोन्ही विजेत्यांमध्ये समान वाटून दिली जाईल.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in