गाझाच्या हॉस्पिटलवर रॉकेट हल्ला ५०० ठार : इस्त्रायल, हमासचे एकमेकांवर आरोप

पुराव्यादाखल इस्रायली लष्कराने फोन कॉल रेकॉर्डिंग सादर केले आहे
गाझाच्या हॉस्पिटलवर रॉकेट हल्ला ५०० ठार : इस्त्रायल, हमासचे एकमेकांवर आरोप

तेल अवीव : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या इस्रायल आणि हमास युद्धातील सर्वात मोठा हल्ला मंगळवारी रात्री गाझामधील अहली अरब सिटी हॉस्पिटलवर झाला. हॉस्पिटलवर झालेल्या रॉकेट हल्ल्यात ५०० लोक मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. इस्रायलने हा हल्ला केल्याचा दावा हमासने केला आहे. तर इस्रायलने रुग्णालयावरील हल्ल्यात आपला कोणताही सहभाग नसल्याचे म्हटले असून हमासकडूनच हा हल्ला झाल्याचा पुरावा सादर केला आहे.

पुराव्यादाखल इस्रायली लष्कराने फोन कॉल रेकॉर्डिंग सादर केले आहे. यामध्ये हमासचे दोन ऑपरेटिव्ह हॉस्पिटलवरील हल्ल्याबाबत बोलत आहेत. यामध्ये तो म्हणत आहेत की, ‘इस्लामिक जिहादने रुग्णालयाजवळील स्मशानभूमीतून सुमारे १० रॉकेट डागले. यापैकी एक मिसफायर झाले. ऑडिओ क्लिपमध्ये, एक हमास ऑपरेटिव्ह दुसऱ्याला म्हणतो, ‘हे आपल्या बाजूने डागलेल्या रॉकेटमुळे घडले?’ प्रत्युत्तरात, दुसरा ऑपरेटिव्ह म्हणतो, ‘असे दिसत आहे, कारण सापडलेले रॉकेटचे तुकडे इस्रायली सैन्याचे नाहीत.’ हमासच्या दाव्यावर इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी लिहिले आहे की, ‘ज्यांनी आमच्या मुलांची निर्घृण हत्या केली, ते त्यांच्याच मुलांचेही मारेकरी आहेत.’

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in