पुतिन यांची प्रकृती बिघडल्याची अफवा

पुतिन यांची तब्येत रविवारी सायंकाळी अचानक बिघडल्याची बातमी रशियन टेलिग्राम चॅनेलने दिली होती
पुतिन यांची प्रकृती बिघडल्याची अफवा

मॉस्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची तब्येत बिघडल्याची बातमी प्रसारमाध्यमांत पसरली होती. मात्र, ही केवळ अफवा असून पुतिन यांची तब्येत चांगली असल्याचा खुलासा क्रेमलीनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी केला.

पुतिन यांची तब्येत रविवारी सायंकाळी अचानक बिघडल्याची बातमी रशियन टेलिग्राम चॅनेलने दिली होती. त्या आधारावर अनेक पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले. त्यात पुतिन यांची तब्येत खालावली असून ते सार्वजनिक ठिकाणी वावरताना त्यांचा तोतया किंवा डुप्लिकेट वापरतात असेही सांगितले जात होते. मात्र, या सर्व वृत्तांमध्ये काहीही तथ्यांश नसून त्या अफवा आहेत. पुतिन यांची प्रकृती ठणठणीत आहे. तसेच ते तोतया वापरतात ही तर हास्यास्पद बाब आहे, असे स्पष्टीकरण क्रेमलीनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी दिले आहे.

logo
marathi.freepressjournal.in