russian ukraine war : रशियाकडून थेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना संपवण्याची धमकी

बुधवारी रशियाने क्रेमलिनमधील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्याचा दावा केला होता
russian ukraine war : रशियाकडून थेट युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांना संपवण्याची धमकी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर कथित ड्रोन हल्ल्यानंतर युक्रेन आणि रशियामधील तणाव वाढला आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी दावे-प्रतिदावे केले जात आहेत. असा हल्ला झाल्याचा दावा रशियाने केला असून त्याच्याशी संबंधित एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दुसरीकडे, युक्रेनकडून झालेल्या या हल्ल्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, रशियाकडून युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना हटवण्याच्या थेट धमकीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणाव वाढण्याची शक्यता आहे. बुधवारी रशियाने क्रेमलिनमधील राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर ड्रोन हल्ला झाल्याचा दावा केला होता. याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. हा हल्ला युक्रेनने केल्याचा दावा रशियाने केला आहे.

या पार्श्वभूमीवर युक्रेनचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र, रशियन सरकार आपल्या भूमिकेवर ठाम असून रशियाकडून थेट अण्वस्त्र हल्ला होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. "ही बाब अतिशय गंभीर आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यासंदर्भात योग्य तो निर्णय घेतील. इथून काहीही होऊ शकतं. खरं तर हे थेट युद्ध नाही. आम्ही युक्रेनमध्ये विशेष लष्करी कारवाई करत आहोत. युक्रेनने या गोष्टीचा विचार करायला हवा. आपल्याकडेही बरीच अण्वस्त्रे आहेत", असा गंभीर इशारा रशियातील भारतीय वंशाचे संसद सदस्य अभय कुमार सिंग यांनी दिला आहे. दरम्यान, एकीकडे युक्रेनचा या हल्ल्याशी काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर आता रशियाने थेट राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांना पदच्युत करण्याची भाषा केली आहे. “या दहशतवादी हल्ल्यानंतर झेलेन्स्की आणि त्याच्या साथीदारांना संपवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आता झेलेन्स्कीला बिनशर्त आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी करण्याची देखील गरज नाही", असे रशियाचे माजी अध्यक्ष आणि रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपाध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांनी युक्रेनला जाहीरपणे चेतावणी दिली.
“सर्वांना माहित आहे की हिटलरने देखील अशा कोणत्याही करारावर स्वाक्षरी केली नाही. अशा प्रकारचे लोक नेहमीच दिसतात", एएनआयने वृत्त दिले की त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in