चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ड्रोन हल्ला

चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने शुक्रवारी ड्रोन हल्ला केला. युक्रेनमधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पामध्ये १९८६ साली मोठी आण्विक दुर्घटना झाली होती.
चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाचा ड्रोन हल्ला
Published on

कीव्ह : चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पावर रशियाने शुक्रवारी ड्रोन हल्ला केला. युक्रेनमधील चेर्नोबिल अणुऊर्जा प्रकल्पामध्ये १९८६ साली मोठी आण्विक दुर्घटना झाली होती. यानंतर प्रकल्पाच्या ठिकाणी ‘अणुभट्टी ४’च्या अवशेषांचे संरक्षण करण्यासाठी ‘न्यू सेफ कन्फाइनमेंट स्ट्रक्चर’ (एनएससी) उभारण्यात आले आहे. दरम्यान, या इमारतीवर ड्रोन आदळल्याने स्फोट आणि आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी घडल्याची माहिती आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने (आयएईए) दिली आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी या हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जगाला घातक किरणोत्सर्गापासून वाचवणाऱ्या इमारतीवर शक्तिशाली बॉम्ब असलेल्या ड्रोनने हल्ला करण्यात आला. त्यांनी या हल्ल्याची निंदा करत ही एक दहशतवादी कारवाई असल्याचे म्हटले आहे. तसेच अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याचे धोकादायक परिणामदेखील नमूद केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in