रशिया भारताचा सुख-दुखका साथी! पुतिन यांचीही मोदींकडून स्तुती

रशिया हा भारताचा सार्वकालिक मित्र असून गेल्या दोन दशकांपासून द्विपक्षीय संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी अध्यक्ष पुतिन यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल मोदी यांनी पुतिन यांची स्तुती केली.
PM Modi with Russian President Vladimir Putin
PM Modi with Russian President Vladimir Putin
Published on

मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांवर शिक्कमोर्तब केले. रशिया हा भारताचा सार्वकालिक मित्र असून गेल्या दोन दशकांपासून द्विपक्षीय संबंध अधिकाधिक दृढ करण्यासाठी अध्यक्ष पुतिन यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल मोदी यांनी पुतिन यांची स्तुती केली. पुतिन यांनी दोन्ही देशांमधील संबंध नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहेत, रशिया भारताचा सुख-दुख का साथी आहे, असेही मोदी म्हणाले.

भारत आणि रशिया यांच्यातील संबंध परस्पर विश्वास आणि आदर या भक्कम स्तंभांवर आधारित आहेत, जेव्हा या संबंधांची चाचणी घेतली जाते तेव्हा ते अधिकच शक्तिशाली झालेले पाहावयास मिळते, असे मोदी यांनी रशियातील भारतीयांना संबोधित करताना सांगितले. युक्रेनसमवनेतच्या युद्धामुळे पाश्चिमात्य देश पुतिन यांना एकाकी पाडण्याचे प्रयत्न करीत असताना मोदी यांनी रशिया आणि पुतिन यांची स्तुती केली आहे. थंडीच्या मोसमात रशियातील तापमान शून्य अंशाच्या कितीही खाली घसरले तरी भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री मात्र नेहमीच उबदार राहिली आहे, असे मोदी यांनी सांगितले.

रशियाच्या लष्करात यापुढे भारतीयांची भरती नाही

रशियाच्या लष्करामध्ये भारतीयांची मदत कर्मचारी म्हणून भरती करू नये या भारताने केलेल्या आवाहनाला रशियाने अनुकूल प्रतिसाद दिला. त्याचप्रमाणे सध्या जे भारतीय रशियाच्या लष्करात सेवेत आहेत, त्यांना लवकरात लवकर मायदेशात पाठविण्याचेही रशियाने मान्य केले. नरेंद्र मोदी आणि पुतिन यांच्यात सोमवारी चर्चा झाली, त्यावेळी मोदी यांनी रशियाच्या लष्करातील भारतीयांबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता, त्यानंतर त्याला मान्यता देण्यात आली.

फिर भी दिल है हिंदुस्थानी

'सर पे लाल टोपी रुसी, फिर भी दिल है हिंदुस्थानी' या ज्येष्ठ अभिनेते राज कपूर यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या गाण्याचा यावेळी मोदी यांनी उल्लेख केला. गाणे जुने असले तरी त्यामधील भावना सदाबहार आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचाही मोदी यांनी नामोल्लेख केला. मिथुन यांचे अनेक चाहते रशियात आहेत.

logo
marathi.freepressjournal.in