Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा महाभयंकर हल्ला; ४७७ ड्रोन, ६० क्षेपणास्त्रांनी युक्रेन हादरले

रशियाने युक्रेनवर एका रात्रीत ५३७ हवाई हत्यारांचा मारा करत युद्धाच्या सुरुवातीपासूनचा सर्वात मोठा हल्ला केला आहे, अशी माहिती युक्रेनच्या हवाई दलाने दिली. या हल्ल्यात ४७७ ड्रोन आणि डिकोय (फसवणारे यंत्र) तसेच ६० क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्यापैकी २४९ हत्यारे पाडण्यात यश आले, तर २२६ हत्यारे हरवली, जी इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमुळे निष्क्रिय झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Russia Ukraine War : रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा महाभयंकर हल्ला; ४७७ ड्रोन, ६० क्षेपणास्त्रांनी युक्रेन हादरले
Published on

कीव्ह : रशियाने युक्रेनवर एका रात्रीत ५३७ हवाई हत्यारांचा मारा करत युद्धाच्या सुरुवातीपासूनचा सर्वात मोठा हल्ला केला आहे, अशी माहिती युक्रेनच्या हवाई दलाने दिली. या हल्ल्यात ४७७ ड्रोन आणि डिकोय (फसवणारे यंत्र) तसेच ६० क्षेपणास्त्रांचा समावेश होता. त्यापैकी २४९ हत्यारे पाडण्यात यश आले, तर २२६ हत्यारे हरवली, जी इलेक्ट्रॉनिक जॅमिंगमुळे निष्क्रिय झाली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

युक्रेनच्या हवाई दलाचे प्रमुख प्रवक्ते युरी इह्नात यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही हल्ल्याची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई होती. यामध्ये विविध प्रकारच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा समावेश होता. या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये नव्याने अस्थैर्य पसरले असून, शेजारील देश पोलंड आणि त्यांच्या सहयोगी देशांनी आपली लढाऊ विमाने सज्ज ठेवली, ज्यामुळे पोलिश हवाई हद्दीची सुरक्षितता कायम राहील, असे पोलंडच्या हवाई दलाने स्पष्ट केले.

हल्ल्यातील हानी

खेरसॉनमध्ये एका ड्रोन हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रांतीय गव्हर्नर ऑलेक्झांडर प्रोकुडीने दिली. चेरकासी प्रांतात सहा नागरिक जखमी झाले आहेत, त्यामध्ये एका लहान मुलाचाही समावेश आहे, अशी माहिती गव्हर्नर इहोर टाबुरेट्स यांनी दिली.

शांतता चर्चेच्या प्रयत्नांवर पाणी

हा ताजा हल्ला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इस्तंबूलमध्ये थेट शांतता चर्चेसाठी तयारी दर्शवल्यानंतर झाला. मात्र, युद्ध चौथ्या वर्षात पदार्पण करत असताना कुठल्याही शांतता प्रयत्नांना यश आलेले नाही. इस्तंबूलमध्ये रशिया आणि युक्रेन यांच्यात नुकत्याच झालेल्या दोन बैठका अपयशी ठरल्या आणि कोणताही ठोस निर्णय घेता आला नाही.

नवीन तंत्रज्ञान

या युद्धात दोन्ही देशांनी लांब पल्ल्याचे ड्रोन हल्ले मोठ्या प्रमाणावर वापरले आहेत. या हल्ल्यांमुळे हे युद्ध एक प्रयोगशाळा बनले आहे. जिथे नव्या तंत्रज्ञानाची व घातक शस्त्रांची चाचणी केली जात आहे. रशियाचा हा सर्वात मोठा हल्ला फक्त युद्धाच्या तीव्रतेचे नव्हे तर संभाव्य राजनैतिक अपयशाचेही निदर्शक आहे.

logo
marathi.freepressjournal.in