Iran vs US-Israel War : रशियाकडून गॅसवर अचानक ४० टक्के सवलतीचा प्रस्ताव

इराण आणि अमेरिकेतील संघर्षाचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर थेट परिणाम झाला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध उठवताच रशियाने भारताला तेलाचा पुरवठा सुरू केला आहे.
Iran vs US-Israel War : रशियाकडून गॅसवर अचानक ४० टक्के सवलतीचा प्रस्ताव
Iran vs US-Israel War : रशियाकडून गॅसवर अचानक ४० टक्के सवलतीचा प्रस्ताव
Published on

मॉस्को : इराण आणि अमेरिकेतील संघर्षाचा जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर थेट परिणाम झाला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्बंध उठवताच रशियाने भारताला तेलाचा पुरवठा सुरू केला आहे. आता आशियाई खरेदीदारांना ‘एलएनजी’वर ४० टक्क्यांपर्यंत लक्षणीय सवलत देण्याचा प्रस्ताव रशियाने मांडला आहे. यामुळे भारतासह आशियाई देशांना परवडणाऱ्या किमतीत ‘एलएनजी’ खरेदी करण्याची संधी मिळू शकते. अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनी बंद झाल्याने निर्माण झालेल्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर रशियाने दक्षिण आशियाई देशांना नैसर्गिक वायूवर मोठी ऑफर दिली आहे. रशियाने आशियाई देशांना स्वस्त गॅसचा प्रस्ताव दिला आहे, ज्यामुळे बाजारात खळबळ माजली आहे. भारत आणि दक्षिण आशियासारख्या देशांना, जेथे ऊर्जेची प्रचंड मागणी आणि वापर आहे, त्यांना रशिया ४० टक्क्यांपर्यंतच्या मोठ्या सवलती देऊ करत आहे.

बहुतेक देशांसाठी ऊर्जा पुरवठा एक मोठी चिंतेची बाब बनली असताना रशियाकडून ही आकर्षक ऑफर आली आहे. त्याचवेळी, मध्य-पूर्वेतील तणावात गेल्या आठवड्यातच रशियाने भारताला क्रूड आणि नैसर्गिक वायूचा वाढीव पुरवठा करण्याचा प्रस्ताव दिला होता. रशिया जागतिक तणावाच्या परिस्थितीच्या संधीचा फायदा घेत असून आपला गॅस स्वस्त दरात विकून नवीन खरेदीदार शोधत असल्याचा दावा एका अहवालात करण्यात आला आहे.

ऑफर भारताच्या कामाची?

भारताने रशियाचीही सूट मान्य करून स्वस्त एलएनजी खरेदी केल्यास त्याचे परिणाम अनेक स्तरांवर जाणवू शकतात. या निर्णयामुळे फायदे आणि धोके दोन्ही निर्माण होऊ शकतात. सर्वप्रथम सर्वसामान्य जनता आणि उद्योगाला फायदा मिळू शकतो. गॅस ४० टक्क्यांपर्यंत स्वस्त होऊ शकतो, ज्यामुळे देशाचा ऊर्जा खर्च कमी होईल आणि परिणामी वीजनिर्मिती, खते आणि सीएनजी/पीएनजीच्या किमतींवरील दबाव कमी होऊ शकेल.

logo
marathi.freepressjournal.in