प्रशांत महासागरात पाच शक्तिशाली भूकंप; रशियामध्ये ओढवलेले त्सुनामीचे संकट अखेर टळले

रशियाजवळील प्रशांत महासागरात रविवारी एकापाठोपाठ एक असे पाच शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसल्याने खळबळ माजली आहे.
प्रशांत महासागरात पाच शक्तिशाली भूकंप; रशियामध्ये ओढवलेले त्सुनामीचे संकट अखेर टळले
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मॉस्को : रशियाजवळील प्रशांत महासागरात रविवारी एकापाठोपाठ एक असे पाच शक्तिशाली भूकंपाचे धक्के बसल्याने खळबळ माजली आहे. लागोपाठ झालेल्या भूकंपामुळे रशियामध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, नंतर हा धोका टळल्याचे जाहीर करण्यात आले. अमेरिकन भूगर्भ सर्वेक्षण संस्थेने (यूएसजीएस) रशियामध्ये त्सुनामी येऊ शकते, असा अंदाज वर्तवला होता.

रशियामध्ये सुरुवातीला रिश्टर स्केल ५.० आणि ६.७ तीव्रतेचे भूकंप झाले. त्यावेळी त्सुनामीचा इशारा देण्यात आला नव्हता. पण त्यानंतर ७.४ तीव्रतेचा भूकंप झाल्याने ‘यूएसजीएस’ने त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. भूकंपामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

‘यूएसजीएस’ने दिलेल्या इशाऱ्यात म्हटले आहे की, पेट्रोपावलोव्स्क-कामचत्स्की शहरापासून दूर, प्रशांत महासागरात भूकंपाच्या केंद्रापासून ३०० किलोमीटर असलेल्या समुद्राच्या किनारी भागात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. रशियाच्या किनाऱ्यावर ३० सेंटीमीटर ते एक मीटर (३.३ फूट) आणि जपान तसेच अमेरिकेच्या हवाई राज्यात ३० सेंटीमीटरपेक्षा (एक फूट) कमी उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

रशियामध्ये सुरुवाती आलेल्या भूकंपानंतर लागोपाठ पाच धक्के बसले. भूकंपाचे केंद्र रशियामधील कामचटका क्षेत्राची राजधानी पेट्रोपावलोव्स्क-कामचत्स्कीपासून सुमारे १४० कि.मी पूर्वेला २० किलोमीटर खोलीवर होते.

दरम्यान, एपीच्या अहवालानुसार, ‘जर्मन रिसर्च सेंटर फॉर जियोसाइन्सेस’ने (जीएफझेड) सांगितले की, रविवारी पहाटे रशियाच्या कामचटका किनाऱ्याजवळ ६.५ पेक्षा जास्त तीव्रतेचे दोन भूकंप झाले. भूकंपांची तीव्रता ६.६ आणि ६.७ अशी मोजली गेली. दोन्ही भूकंपाचे केंद्र जमिनीपासून फक्त १० कि.मी. खोल होते. त्यामुळे भूकंपाचा प्रभाव जास्त जाणवला. भूकंप उथळ असल्याने मोठे नुकसान झाले नसावे. पण, लोकांना जोरदार धक्के जाणवले. पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने कामचत्स्कीसाठी त्सुनामीचा इशारा दिला होता.

logo
marathi.freepressjournal.in